वडगाव निंबाळकर पोलीस स्टेशन च्या सहाय्यक पोलीस निरिक्षक जीवन मोहिते यांचा अप्पर पोलीस अधिक्षकांच्या हस्ते गौरव .
वडगाव निंबाळकर पोलीस स्टेशन च्या सहाय्यक पोलीस निरिक्षक जीवन मोहिते यांचा अप्पर पोलीस अधिक्षकांच्या हस्ते गौरव .
SB 24 NEWS LIVE .
वडगाव निंबाळकर -प्रतिनिधी .
वडगाव निंबाळकर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील विविध चोरीच्या गुन्ह्यांचा तपास करुन तब्बल १० गुन्हे उघडकीस आणण्यात पोलिसांना यश आले आहे .
या उल्लेखनिय कामगिरी बद्दल वडगाव निंबाळकर पोलीस ठाण्यातील सहाय्यक पोलीस निरिक्षक जीवन मोहिते यांचा अप्पर पोलीस अधिक्षक गणेश बिरादार यांच्या हस्ते गौरव करण्यात आला .
वडगाव निंबाळकर पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडलेल्या चोरीच्या घटनांचा गांभीर्याने तपास करण्यात आला .
हे गुन्हे अगदी कमी कालावधीत विविध चोरींच्या गुन्ह्यांचा छडा लावत १० गुन्हे उघडकीस आणण्यात जीवन मोहिते यांची महत्वपुर्ण भुमिका ठरली .त्यांच्या या उत्कृष्ठ कामगिरी मुळे नागरिकां मधून समाधान व्यक्त होत असून पोलिसांच्या कार्यक्षमतेचे कौतुक होतं आहे.विविध बाबींचा बारकाईने तपास करुन पोलिसांनी गुन्ह्याचा छडा लावला .नागरिकांमध्ये सुरक्षिततेची भावना निर्माण करण्यास या कारवाईमुळे मदत झाली असून गुन्हेगारांवर पोलीसांची करडी नजर असल्याचा संदेशही यातून मिळाला .
भविष्य काळात कोणत्याही प्रकारचा गुन्हा घडू नये यासाठी वडगाव निंबाळकर पोलीस स्टेशन कायम सतर्क राहील.असे ही यावेळी मोहिते यांनी सांगितले .
या उल्लेखनीय कामगिरीची दखल घेतं अप्पर पोलीस अधिक्षक गणेश बिरादार यांनी सहाय्यक पोलीस निरिक्षक जीवन मोहिते यांना प्रशस्तीपत्र देऊन अभिनंदन केले . नागरिकांच्या सुरक्षतेसाठी व गुन्हेगारीला आळा बसवण्यासाठी वडगाव निंबाळकर पोलीस ठाण्याचे प्रयत्न सुरु असल्याचे यावेळी स्पष्ट करण्यात आले.

SB 24 NEWS LIVE पोर्टल वर बातम्या व जाहीरातीसाठी
मुख्यसंपादक -शरद भगत.
संपर्क -7756089343










