रविंद्र बापु जाधव यांना जय मल्हार क्रांती संघटनेच्या वतीने युवा समाज रत्न पुरस्काराने सन्मानित.
रविंद्र बापु जाधव यांना जय मल्हार क्रांती संघटनेच्या वतीने युवा समाज रत्न पुरस्काराने सन्मानित.
SB 24 NEWS LIVE .
मोरगाव प्रतिनिधी –
बारामती तालुक्यातील श्री मयुरेश्वर तिर्थ क्षेत्र असलेल्या मोरगाव गावातील सामाजिक कार्यकर्ते तथा जय मल्हार क्रांति संघटनेचे महाराष्ट्र राज्याचे युवक सचिव रविंद्र उर्फ बापु जाधव यांना युवा समाज रत्न पुरस्काराने सन्मानित केले .
रविंद्र बापु जाधव हे मोरगाव येथील सर्व सामान्य कुटुंबातील असून ते मोरगाव येथील सामाजिक ,शैक्षणिक कार्यात ते नेहमीच सक्रीय असतात.
रामोशी समाजातील कोणत्याही कुटुंबावरती वा व्यक्तींवर कसल्याही प्रकारचा अन्याय झाला तर जय मल्हार क्रांती संघटनेचे संस्थापक तथा राष्ट्रीय अध्यक्ष श्री दौलतनाना शितोळे यांच्या मार्गदर्शनाखाली ते न्याय मिळवून देण्यासाठी अहोरात्र प्रयत्नशील असतात.
नुकतीच भिवरी येथे राजे उमाजी नाईक यांची शासकीय जयंती साजरी करण्यात आली .या जयंती दिवशी रविंद्र बापु जाधव यांच्या नावाची घोषणा झाली .दिनांक १० सप्टेंबर रोजी पाटस येथील जय मल्हार क्रांती संघटना यांच्या वतीने राजे उमाजी नाईक जयंतीच्या कार्यक्रमात रविंद्र बापु जाधव यांना युवा समाज रत्न पुरस्कार दौलत नाना शितोळे यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला .
या पुरस्काराने रविंद्र बापु जाधव यांचे मित्र परिवार ,मोरगाव व पंचक्रोशीतून अभिनंदनाचा वर्षाव होतं आहे.
”
रविंद्र बापु जाधव यांना जय मल्हार क्रांती संघटनेच्या वतीने युवा समाज रत्न पुरस्काराने सन्मानित करताना श्री दौलत नाना शितोळे व पदाधिकारी .
जय मल्हार क्रांती संघटना यांच्या वतीने मला युवा समाज रत्न पुरस्कार दिल्याने मी संघटनेचा तसेच श्री दौलत नाना शितोळे यांचा कायम आभारी राहीन .या पुरस्कारा मुळे मला एक नवी प्रेरणा मिळाल्याने मी समाज हितासाठी वा श्री दौलत नाना शितोळे तसेच जय मल्हार क्रांती संघटने शी कायम एकनिष्ठ राहून नानांच्या मार्गदर्शना खाली काम करत राहीन .”
रविंद्र बापु जाधव .
युवक सचिव -जय मल्हार क्रांती संघटना महाराष्ट्र राज्य.
वडगाव निंबाळकर पोलीस स्टेशन च्या सहाय्यक पोलीस निरिक्षक जीवन मोहिते यांचा अप्पर पोलीस अधिक्षकांच्या हस्ते गौरव .
वडगाव निंबाळकर पोलीस स्टेशन च्या सहाय्यक पोलीस निरिक्षक...
ईद -ए - मिलादुन्नबी निमित्त वडगाव निंबाळकर येथे भालदार परिवारातर्फे जिल्हा परिषद प्राथमिक शाळांमध्ये अल्पोउपहाराचे वाटप .
ईद -ए - मिलादुन्नबी निमित्त वडगाव निंबाळकर येथे...
पवईमाळ येथे भेंडीच्या प्रतवारी ,वर्गीकरण व सी.एफ .बी बॉक्समधील पॅकिंगचे प्रात्यक्षिक.
पवईमाळ येथे भेंडीच्या प्रतवारी, वर्गीकरण व सी. एफ. बी.
बॉक्समधील पॅकिंगचे प्रात्यक्षिक
पवईमाळ येथे भेंडीच्या प्रतवारी...