ईद -ए – मिलादुन्नबी निमित्त वडगाव निंबाळकर येथे भालदार परिवारातर्फे जिल्हा परिषद प्राथमिक शाळांमध्ये अल्पोउपहाराचे वाटप .
ईद -ए – मिलादुन्नबी निमित्त वडगाव निंबाळकर येथे भालदार परिवारातर्फे जिल्हा परिषद प्राथमिक शाळांमध्ये अल्पोउपहाराचे वाटप .
SB 24 News -प्रतिनिधी .
वडगाव निंबाळकर .
ईद -ए – मिलादुन्नबी निमित्त वडगाव निंबाळकर मध्ये भालदार परिवारातर्फे जिल्हा परिषद प्राथमिक शाळांमध्ये अल्पोउपहाराचे वाटप .
बारामती तालुक्यातील वडगाव निंबाळकर येथे मोहम्मद पैगंबर (स.अ.स)जयंती तथा ईद -ए -मिलादुन्नबी निमित्त वडगाव मधील युवा पत्रकार तथा सामाजिक कार्यकर्ते फिरोज भालदार व त्यांच्या संपुर्ण परिवाराने सामाजिक बांधिलकी जपत वडगाव निंबाळकर येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा क्रमांक -१ व शाळा क्रमांक २ येथील विद्यार्थ्यांना अल्पउपहार देण्यात आला.
विद्यार्थ्यांमध्ये प्रेम ,बंधुभाव ,एकोपा तसेच सर्वधर्म समभाव या मुल्यांचे धडे या विद्यार्थ्यांना घडावे यासाठी भालदार कुटुंबियांकडून हा उपक्रम राबवल्याचे त्यांच्याकडून सांगण्यात आले .फिरोज भालदार हे पत्रकार क्षेत्रामध्ये कार्य करत असल्याने ते समाजातील अनेक प्रश्न निर्भीडपणे मांडत असतात.याच समाजाचे आपण काहीतरी देणे लागतो ही भावना मनात ठेवून त्यांनी या उपक्रमाबाबत कुटुंबियांशी चर्चा केली व या उपक्रमात संपुर्ण भालदार कुटुंबानेच भाग घेतला .
अगदी सामान्य कुटुंब असलेले भालदार कुटुंब सामाजिक कार्यात नेहमीच अग्रेसर असल्याचे स्थानिकांकडून सांगण्यात आले.
जिल्हा परिषदेच्या शिक्षकानीं फिरोज भालदार व भालदार परिवाराचे कौतुक केले .अल्पउपहारामुळे विद्यार्थ्यांच्या चेहर्यावर आनंद झळकल्याचे पहायला मिळाले.

SB 24 NEWS LIVE पोर्टल वर बातम्या व जाहीरातीसाठी
मुख्यसंपादक -शरद भगत.
संपर्क -7756089343







