जोगवडी -कोळविहीरे रस्त्याची दुरावस्था ,वाहन चालकांची वाहन चालवताना होते कसरत.खड्यांमुळे अपघाताची शक्यता.
जोगवडी -कोळविहीरे रस्त्याची दुरावस्था ,वाहन चालकांची वाहन चालवताना होते कसरत.खड्यांमुळे अपघाताची शक्यता.
SB 24 NEWS LIVE .
प्रतिनिधी -जोगवडी .
जोगवडी -कोळविहीरे रस्त्याची दुरावस्था ,वाहन चालकांना करावी लागते कसरत.बारामती व पुरंदर तालुक्यांना जोडणारा जिल्हा मार्गाचे अनेक वर्षांपासून दुरावस्था झाल्याचे चित्र दिसून येतं आहे .बारामती तालुक्यातील मुर्टी ,जोगवडी ,तावरे वस्ती ,चोपडज वाकी व विविध भा

गातून लोकं जेजुरी येथील औद्योगिक वसाहत (MIDC )मध्ये कामाला जातं असतात हे सर्व जण दुचाकी वर प्रवास करतं असतात .जोगवडी ते कोळविहीरे गावचे अंतर अगदी कमी असले तरी येथील रस्त्याच्या दुरावस्थे मुळे वाहन चालकांना मानसिक व शारिरीक त्रास सहन करावा लागतं आहे .अनेक खड्डे चुकवत असताना ओव्हर टेक करत असताना अपघाताची शक्यता ही ज्यास्त असल्याने चालक चिंताग्रस्त होतं आहे .
जोगवडी कोळविहीरे रस्त्याचा वापर करताना नविन गाडी देखील लवकरच खराब होतं आहे .दुचाकी चालक तरुणांचे मनके देखिल गेले असल्याने या रस्त्यामुळे अनेक तरुण बेरोजगार देखिल झाले असल्याचे नागरिक सांगत आहेत.
पुणे जिल्हा परिषदे अंतर्गत या रस्त्याचे काम लवकरात लवकर सुरु व्हावे अशी मागणी वाहन चालक करत आहेत.

SB 24 NEWS LIVE पोर्टल वर बातम्या व जाहीरातीसाठी
मुख्यसंपादक -शरद भगत.
संपर्क -7756089343






