महाराष्ट्र राज्याचे कृषी मंत्री दत्तामामा भरणे यांची बारामती तालुका दुष्काळ पहाणी दौरा , शेतकर्यांना शासनाकडून पुर्णपणे मदत करणार असल्याचे कृषी मंत्री भरणे यांचे आश्वासन .
महाराष्ट्र राज्याचे कृषी मंत्री दत्तामामा भरणे यांची बारामती तालुका दुष्काळ पहाणी दौरा , शेतकर्यांना शासनाकडून पुर्णपणे मदत करणार असल्याचे कृषी मंत्री भरणे यांचे आश्वासन .
SB 24 NEWS LIVE –
मुर्टी प्रतिनिधी .
सध्या महाराष्ट्र राज्यात प्रखरपणे दुष्काळ जाणवतं असून संपुर्ण शेतकरी वर्ग चिंताग्रस्त दिसतं आहे.
दिनांक २३ सप्टेंबर २०२६ रोजी राज्याचे कृषी मंत्री दत्ता मामा भरणे यांनी इंदापुर ,दौंड व बारामती तालुक्यात दौरा केला.बारामती तालुक्यातील गेली अनेक वर्ष दुष्काळी गाव म्हणुन ओळख असणारे मुर्टी गावातील एका शेत बांधावर भरणे यांनी पहाणी केली .बाजरीचे पिक व इतर पिके ही पाण्या अभावी धोक्यात असल्याचे या वेळी कृषी मंत्री भरणे यांनी सांगितले .महाराष्ट्र शासना तर्फे शेतकर्यांना आर्थिक मदत मिळवून देण्याचे आश्वासन देखिल या वेळी दिले .मुर्टी येथील पिके पहाताना अनेक शेतकर्यांनी आपल्या व्यथा कृषी मंत्री यांना सांगितल्या .दत्ता मामा भरणे यांनी त्या शांतपणे ऐकून घेतल्या व या समस्यांवर राज्य शासनाकडून शेतकर्यांना परिपुर्ण मदत करणार असल्याचे ही त्यांनी सांगितले .बारामती येथील मुर्टी दुष्काळ दौरा करत असताना त्यांच्या सोबतं विद्यमान पुणे जिल्हा वीरधवल जगदाळे ,पुणे जिल्हा सदस्या सौ रोहिणी ढोले ,बारामती पंचायत समितीचे सभापती किरण तावरे ,बारामती पंचायत समिती सदस्य तथा गटनेेते बाबासाहेब चोरमले ,सोमेश्वर सहकारी साखर कारखान्याचे माजी संचालक लालासाहेब नलवडे ,निरा कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक बाळासो गुलाब जगदाळे ,मुर्टी गावच्या सरपंच सौ कोमल प्रशांत जगताप ,उपसरपंच किरण जगदाळे ,अरविंद जगदाळे ,मोहन जगदाळे ,तानाजी राजपुरे ,रविंद्र शिंदे व ग्रामस्थ ,शेतकरी उपस्थित होते .

SB 24 NEWS LIVE पोर्टल वर बातम्या व जाहीरातीसाठी
मुख्यसंपादक -शरद भगत.
संपर्क -7756089343

