बारामतीच्या प्रातांकडून मुर्टी व मोढवे येथील पिकांची पहाणी .
मुर्टी व सात गावांना पाणी पुरवठा करणार्या जल जीवन प्राधिकरणाला देखिल दिली भेट.
बारामतीच्या प्रातांकडून मुर्टी व मोढवे येथील पिकांची पहाणी .
मुर्टी व सात गावांना पाणी पुरवठा करणार्या जल जीवन प्राधिकरणाला देखिल दिली भेट.
SB 24 NEWS LIVE – प्रतिनिधी .
दुष्काळी परिस्थितीच्या पार्श्वभुमिवर बारामती तालुक्यातील मुर्टी गावाला बारामतीचे प्रांताअधिकारी उत्तम दिघे यांनी भेट दिली .खरीपातील पिकांची पाहणी करुन समस्या जाणून घेतल्या .
पश्चिम भागात बाजरी , मूग ,मटकी ,हुलगा ,भुईमूग ,
सुर्यफूल ही पिके पावसा अभावीजळून गेली आहेत .दि २ ऑक्टोंबर रोजी मुर्टी येथे बारामती तालुका प्रांतअधिकारी दिघे यांनी कांदा ,बाजरी पिकांची पहाणी करुण शेतकर्यांच्या समस्या जाणून घेतल्या .या वेळी मोरगाव मंडल अधिकारी प्रमिला लोखंडे, मुर्टी गावचे ग्राममहसूल अधिकारी श्री संदिप आहिरे,मुर्टी गावच्या ग्रामविकास अधिकारी सौ रोहिणी पवार ,सोमेश्वर साखर कारखान्याचे माजी संचालक लालासो नलवडे,उपसरंपच किरण जगदाळे ,हरिमामा जगदाळे ,पोलीस पाटील तृप्ती गदादे ,दिनेश भोसले व इतर ग्रामस्थ उपस्थित होते .मुर्टी येथील बाजरी पिकाचे परिक्षण करताना प्रांताधिकारी यांनी ग्राममहसूल अधिकारी व मंडलअधिकारी यांना पिके हिरवी असलेली परंतू त्याची पुर्ण वाढ न झालेल्या पिकांचा पंचनामा करण्याच्या सुचना दिल्या आहेत .
उपसरपंच किरण जगदाळे यांनी प्रांताअधिकारी दिघे साहेबांना जल जीवन प्राधिकरण या योजनेची पहाणी करण्याची विनंती केली असता दिघे साहेबांनी प्राधिकरण योजनेची पहाणी करुन संबंधित अधिकारी व लोकप्रतिनिधींची मिटींग आचार संहिता झाल्यावर लावून योग्य तो उपाय करण्याचे आश्वासन दिले आहे तसेच पुरंदर उपसा सिंचन बाबत देखिल योग्य ती दखल देण्याचे आश्वासन दिल्याने ग्रामस्थांनी समाधान व्यक्त केले .

SB 24 NEWS LIVE पोर्टल वर बातम्या व जाहीरातीसाठी
मुख्यसंपादक -शरद भगत.
संपर्क -7756089343




