पवईमाळ येथे भेंडीच्या प्रतवारी ,वर्गीकरण व सी.एफ .बी बॉक्समधील पॅकिंगचे प्रात्यक्षिक.
पवईमाळ येथे भेंडीच्या प्रतवारी, वर्गीकरण व सी. एफ. बी.
बॉक्समधील पॅकिंगचे प्रात्यक्षिक
पवईमाळ येथे भेंडीच्या प्रतवारी ,वर्गीकरण व सी.एफ .बी बॉक्समधील पॅकिंगचे प्रात्यक्षिक.
SB 24 NEWS LIVE -प्रतिनिधी.
पवईमाळ- ग्रामीण कृषी कार्यानुभव कार्यक्रम (RAWE) २०२६-२७ अंतर्गत कृषी महाविद्यालय, बारामती येथील पवईमाळ या गावामध्ये भेंडीची प्रतवारी, वर्गीकरण व सी.एफ.बी बॉक्समध्ये पॅकिंग या विषयावर प्रात्यक्षिक घेण्यात आले.
या प्रात्यक्षिकादरम्यान शेतकऱ्यांना भेंडीची काढणी केल्यानंतर बाजारपेठेच्या दृष्टीने योग्य प्रतवारी व वर्गीकरण करण्याचे महत्त्व समजावून सांगण्यात आले. प्रात्यक्षिकामध्ये सी.एफ.बी बॉक्समध्ये पॅकिंगची प्रत्यक्ष प्रक्रिया दाखविण्यात आली.
भेंडीसारख्या नाजूक व लवकर खराब होणाऱ्या भाजीपाल्याची काढणीनंतरची गुणवत्ता टिकवून ठेवण्यासाठी सी.एफ.बी बॉक्स पॅकिंग उपयुक्त ठरते. पारंपारिक पद्धतीच्या तुलनेत सी.एफ.बी बॉक्समध्ये भेंडीची व्यवस्थित मांडणी करता येते तसेच आकर्षक व स्वच्छ पॅकिंगमुळे ग्राहकांची बाजारपेठेतील मागणी वाढण्यास मदत होते, असे सी.एफ.बी बॉक्सचे अनेक फायदे शेतकऱ्यांना समजावून सांगण्यात आले.
या प्रात्यक्षिकाचे आयोजन कृषीदूत रोहन भोसले, सिद्धेश चव्हाण, प्रणव गुजर, रणजित जाधव,शंभूराज जाधव,श्रेयस जगदाळे, गणेश कदम आणि शिवराज काळे यांनी केले. प्रात्यक्षिकाच्या आयोजनासाठी कृषी महाविद्यालय बारामतीच्या ग्रामीण कृषी कार्यानुभव कार्यक्रमाचे अधिकारी प्रा. एस.पी.गायकवाड सर, प्रा.एस.व्ही.बुरुंगले सर व विषय तज्ज्ञ प्रा.जी.एस.शिंदे सरांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले आहे.



SB 24 NEWS LIVE पोर्टल वर बातम्या व जाहीरातीसाठी
मुख्यसंपादक -शरद भगत.
संपर्क -7756089343









