नियमित कर्जफेड करणार्या शेतकर्यांना दोन लाखाचे अनुदान द्यावे ,कृषीमंत्री भरणे यांना निवेदन .
SB 24 News प्रतिनिधी .
सासवड-
नियमित कर्जफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना दोन लाखांचे अनुदान द्यावे; कृषिमंत्री भरणे मामांना निवेदन.
सासवड : नियमित व वेळेवर कर्जफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना किमान दोन लाख रुपये प्रोत्साहनपर अनुदान देण्यात यावे, या प्रमुख मागणीचे निवेदन आज महाराष्ट्राचे कृषिमंत्री दत्तात्रय भरणे (मामा) यांना सासवड येथे पश्चिम बारामती शेतकरी समूहाच्या वतीने देण्यात आले.
यावेळी चौधरवाडी येथील शेतकरी सुखदेवराव शिंदे व जोगवडी येथील शेतकरी सुनील राजे भोसले यांच्यासह समस्त शेतकरी उपस्थित होते.
यावेळी सुखदेवराव शिंदे यांनी नियमित कर्जफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना शासनाकडून मिळणारे सध्याचे प्रोत्साहनपर अनुदान अपुरे असून, वाढत्या शेती खर्चाच्या पार्श्वभूमीवर किमान दोन लाख रुपयांचे अनुदान देण्याबाबत शासनाने गांभीर्याने विचार करावा, अशी मागणी कृषिमंत्री भरणे मामा यांच्याकडे केली.
“आर्थिक अडचणी असतानाही शेतकरी कर्जाची नियमित परतफेड करून बँका व सहकारी संस्थांची आर्थिक शिस्त टिकवून ठेवतात. त्यामुळे प्रामाणिकपणे कर्जफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना शासनाने न्याय देणे आवश्यक आहे,” अशी भूमिका शेतकऱ्यांच्या वतीने मांडण्यात आली.

SB 24 NEWS LIVE पोर्टल वर बातम्या व जाहीरातीसाठी
मुख्यसंपादक -शरद भगत.
संपर्क -7756089343










