जानाई शिरसाई उपसा सिंचन योजनेच्या विविध मागण्यांसाठी शेतकरी संघर्ष कृती समितीचे २ ऑक्टोंबर पासून उपोषण.
जानाई शिरसाई उपसा सिंचन योजनेच्या विविध मागण्यांसाठी शेतकरी संघर्ष कृती समितीचे २ ऑक्टोंबर पासून उपोषण.
SB 24 NEWS LIVE .
सुपे – प्रतिनिधी .
बारामती,दौंड ,पुरंदर या तीन तालुक्यांना वरदान ठरलेल्या जानाई शिरसाई योजना १९९४ साली सुरु झालेली ही योजना अत्ता मोडकळीस आली आहे .
बारामती तालुक्यातील सुपे व पंचक्रोशीतील शेतीला या योजने द्वारे पाणी दिले जाते .
जानाई शिरसाई योजनेचा अनेक वर्ष दुरुस्ती न केल्या मुळे तसेच बंद पाईप लाईन पुरवठ्या द्वारे पाणी येतं नसल्याने शेतातील पिके जळतं असल्याने येथील शेतकरी संघर्ष कृती समितीने बंद पाईप लाईन ची मागणी केली असून जर मागणी पुर्ण नाही झाली तर २ ऑक्टोंबर म्हणजेच महात्मा गांधी जयंती दिवशी अमरण उपोषणाचा ईशारा शेतकरी संघर्ष कृती समितीने दिला आहे .
“”
१९९४ साली जानाई शिरसाई योजना सुपे गावाला वरदान ठरली होती .४५० रुपये खोटी खर्च करुन ही योजना सुरु केली होती .या योजनेला अत्ता ३३ वर्ष पुर्ण झाली असून या योजने द्वारे मिळणारे पाणी गळती होतं असल्याने पुरेशा पाण्या अभावी पिके जळून जातं आहे .
या साठी आम्ही राज्य शासनाकडे बंद पाईप लाईन योजनेची व इतर मागण्या केल्या असून बंद पाईप लाईन साठी शासनाने निधी दिला असला तरी ही योजना आज तागायती कागदावर असून प्रत्यक्ष अंमल बजावणी कधी होईल ? या साठी शेतकरी संघर्ष कृती समिती तर्फे २ ऑक्टोंबर रोजी आमरण उपोषण करणार आहोत.””
पोपट तात्या खैरे .
अध्यक्ष शेतकरी संघर्ष कृती समिती सुपे ,सदस्य -खडकवासला कालवा सल्लागार समिती.

SB 24 NEWS LIVE पोर्टल वर बातम्या व जाहीरातीसाठी
मुख्यसंपादक -शरद भगत.
संपर्क -7756089343







