
जय मल्हार क्रांति संघटनेच्या महाराष्ट्र राज्य युवक सचिव पदी रविंद्र बापु जाधव यांची निवड.
जय मल्हार क्रांती संघटनेच्या महाराष्ट्र राज्याच्या युवक सचिव पदी रविंद्र बापू जाधव यांची निवड.
SB 24 NEWS प्रतिनिधी बारामती -मोरगाव येथे काल ज मल्हार क्रांती संघटनेची आढावा बैठक लोकनेते दौलतनाना शितोळे यांच्या उपस्थितीत संपन्न झाली .
या बैठकीसाठी जय मल्हार क्रांती संघटनेचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.या आढावा बैठकी मध्ये काही पदाधिकरांची निवड करण्यात आली .या मध्ये मोरगाव येथील सामाजिक कार्यकर्ते रविंद्र बापु जाधव यांची महाराष्ट्र राज्याच्या युवक सचिव पदी निवड करण्यात आली.रविंद्रबापु जाधव हे संघटनेच्या माध्यमातून दौलत नाना शितोळे यांच्या मार्गदर्शना खाली सामाजिक विविध कार्यक्रम राबवतं असतात.
रक्तदान शिबिर,मतिमंद विद्यालयात अन्नदान ,गरजू विद्यार्थ्यांना शालेय साहीत्य वाटप अन्याय ग्रस्त व्यक्तींच्या पाठीमागे खंबीर पणे पाठींबा देणे यांसारखे कार्यक्रम राबवत असतात.
(दौलत नाना शितोळे यांच्या मार्गदर्शना खाली जय मल्हार क्रांती संघटनेच्या महाराष्ट्र राज्याच्या युवक सचिवपदी नियुक्ती केल्या बद्दल मी नानांचे व संघटनेचे आभार मानतो ,माझ्या कडून संघटनेसाठी वा सामाजिक घटकांसाठी प्रामाणिक काम करुन संघटनेचे नाव मोठे करेन .
रविंद्र बापु जाधव
जय मल्हार क्रांती संघटना युवक सचिव महाराष्ट्र राज्य.)

SB 24 NEWS LIVE पोर्टल वर बातम्या व जाहीरातीसाठी
मुख्यसंपादक -शरद भगत.
संपर्क -7756089343










