
आसमानी संकटानां तोंड देत महाराष्ट्र राज्य लोकसेवा आयोग द्वारे बिलीफ लिपिक ( न्यायालयीन ) पदी अक्षय शेलार चे घवघवीत यश.
अनेक आसमांनी संकटाना तोंड देऊन महाराष्ट्र लोकसेवा आयोग (MPSC ) परिक्षा द्वारा बेलीफ लिपिक पदी अक्षय शेलार याचा राज्यात १४ वा नंबर ने उतीर्ण .
SB 24 NEWS LIVE – प्रतिनिधी –मोरगाव
बारामती तालुक्यातील जिरायत भाग म्हणुन ओळखल्या जाणार्या मुर्टी गावातील सामान्य कुटुंबातील अक्षय निर्मला बाळासो शेलार याची महाराष्ट्र लोकसेवा आयोगा मार्फत बिलीफ क्लार्क परिक्षेत यश मिळवले .
अक्षय हा जिद्द ,चिकाटी व मेहनती मुलगा असून तो सध्या पुणे जिल्हा मध्यवर्ती बँक शाखा मोरगाव येथे लिपिक या पदावर काम करत आहे .चार वर्षांपुर्वी अक्षय पी एस आय परिक्षेला जात असताना त्याच्या वडीलांचे निधन झाले होते .या दुखातून सावरत असताना वा संपुर्ण कुटुंबाची जबाबदारी खांद्यावर पडल्याने काही मार्क्सने पी एस आय पद हुकले .
वडीलांना वर्ष होऊन गेल्या नंतर दुसर्या व तिसर्या वर्षी ही अक्षय च्या आयुष्यात संकटे येतं होती परंतू या संकटानां त्याने निधड्या छातीने तोंड देत महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या बिलीफ क्लार्क या पदाला गवसणी घालत संकटाला तोंड देत घवघवीत यश मिळवले.
या यशा मुळे अक्षय चे संपुर्ण कुटुंब , पाहुणे , मित्र मंडळ व मुर्टी ग्रामस्थां कडून अभिनंदन होतं आहे .
मुर्टी गावात अनेक जण महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची परिक्षा देऊन यश मिळवणारे असले तरी चिरेखाणवाडीतील पहीलाच व्यक्ती अक्षय शेलार असल्याने वाडीतील नागरिकांनी अभिमान व्यक्त करत भविष्यात अक्षय सारखे बनन्याचा सल्ला शालेय विद्यार्थ्यांना दिला आहे.

SB 24 NEWS LIVE पोर्टल वर बातम्या व जाहीरातीसाठी
मुख्यसंपादक -शरद भगत.
संपर्क -7756089343




