श्री छत्रपती शिवाजी विद्यालय मुर्टी येथे नवोदित विद्यार्थ्यांचे गुलाब पुष्प देऊन केले स्वागत.
SB 24 NEWS – मुर्टी प्रतिनिधी .
संपुर्ण महाराष्ट्रात नविन शैक्षणिक वर्ष २०२६ -२७ चालू झाले आहे .जिल्हा परिषद शाळा असो वा इंग्रजी माध्यमांच्या शाळा किंवा माध्यमिक विद्यालय असो .या सर्वच शाळा सुरु झाल्या असून मुर्टी येथील रयत शिक्षण संस्थेचे श्री छत्रपती शिवाजी विद्यालय येथे नविन प्रवेश घेणार्या विद्यार्थी अथवा विद्यार्थीनीला मान्यवरांच्या हस्ते गुलाब पुष्प देऊन व पाचवीतील काही विद्यार्थ्यांना पुस्तके देऊन त्यांचे स्वागत करण्यात आले .या वेळी रयत शिक्षण संस्थेचे जनरल बॉडी सदस्य लालासाहेब नलवडे ,स्थानिक स्कुल कमिटीचे सदस्य नानासो जगदाळे ,मोहन जगदाळे ,राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्ष (शरद पवार गट ) पुणे जिल्हा उपाध्यक्ष वसंत जगदाळे , पालक वर्ग ,विद्यार्थी व शिक्षक उपस्थितीत होते .प्रभारी मुख्याध्यापक श्री रामदास बांदल सर यांनी विद्यार्थ्यांना सुचना केल्या .या कार्यक्रमाचे सुत्रसंचलन व आभार प्रदर्शन श्री लडकत सर यांनी केले.

SB 24 NEWS LIVE पोर्टल वर बातम्या व जाहीरातीसाठी
मुख्यसंपादक -शरद भगत.
संपर्क -7756089343






