निरा मोरगाव रस्ता अपघातात अल्पवयीन मुलाचा दुर्दैवी मृत्यू .वडगाव निंबाळकर पोलिस स्टेशन ला अद्याप कोणताही गुन्हा दाखल नाही .
मुर्टी -प्रतिनिधी .
निरा मोरगाव रस्त्यावर दिनांक २० मे रोजी भयानक अपघात झाला या अपघातात १४ वर्षीय बालक सार्थक संकेत शिंदे याचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे .या अपघाताचे प्रमुख कारण म्हणजे प्रशासकाचा भोंगळ कारभार २३ एप्रिल २०२६ रोजी सामाजिक कार्यकर्ते तथा पत्रकार शरद भगत यांनी सार्वजनिक बांधकाम विभागाला स्पिड ब्रेकरची मागणी केली होती तर सार्वजनिक बांधकाम विभागाचे देशपांडे सर यांनी असे सांगितले की संबधित ठेकेदाराकडे डांबर शिल्लक नसल्याने स्पिड ब्रेकर मे महीन्यात टाकण्यात येईल .या स्पिड ब्रेकर चे काम २१ मे रोजी चालू देखिल झाले आहे .परंतू मुर्टी गावातील निष्पापाचा जीव गेल्याने मुर्टी ग्रामस्थांनी खंत व्यक्त केली आहे .या अपघाता बद्दल वडगाव निंबाळकर पोलिस स्टेशन च्या वाहतूक शाखेचे प्रमुख सुरज धोत्रे यांना फोन वरुन विचारणा केली असता अजून अपघाताची केस कोणी ही केले नसल्याचे सांगितले .
मुर्टी येथील अपघातातील व सार्वजनिक बांधकाम विभागाच्या हलगर्जीमुळे १४ वर्षीय बालकाचा मृत्यू झाल्यावर ग्रामपंचायत प्रशासक व सार्वजनिक बांधकाम विभाग खडाडून जागे झाले व २१ मे पासून स्पिड ब्रेकरचे काम चालू केले आहे .हे म्हणजे बैल गेला आणि झोपा केला असे झाल्याचे चित्र दिसून येतं असल्याचे येथील स्थानिक नागरिकां मध्ये चर्चा ऐकायला मिळत आहे .

SB 24 NEWS LIVE पोर्टल वर बातम्या व जाहीरातीसाठी
मुख्यसंपादक -शरद भगत.
संपर्क -7756089343



















