जय मल्हार क्रांती संघटनेचे राष्ट्रीय अध्यक्ष दौलत नाना शितोळे यांनी घेतली छगन आण्णा जाधव यांची भेट.
मोरगाव -प्रतिनिधी
मोरगाव येथील जय मल्हर क्रांती संघटनेचे जैष्ठ नेते छगन आण्णा जाधव यांची प्रकृती बिघडली होती. त्यांना पुणे येथील रुबी हॉल हॉस्पिटल येथे ऍडमिट केले होते. दोन दिवसांपूर्वी अण्णांना घरी सोडल्याचे जय मल्हार क्रांती संघटनेचे राष्ट्रीय अध्यक्ष दौलत नाना शितोळे यांना समजले. ते आज छगन अण्णा जाधव यांच्या तब्बेतीची विचारपूस करण्यासाठी त्यांच्या निवासस्थानी भेट घेतली.
“”अण्णां सारख्या जैष्ठ व्यक्तीं मुळे व त्यांच्या मार्गदर्शकांमुळे आज आम्ही महाराष्ट्रभर संघटनेच्या माध्यमातून समाजकारण करतोय. बहुजन चळवळीतील दिपस्तंभ आमच्या सोबत आहेत याचा आम्हाला निश्चित सार्थ अभिमान आहे.””””””
दोलत नाना शितोळे
जय मल्हार क्रांती संघटना -राष्ट्रीय अध्यक्ष.
अण्णांनी तब्येतीची काळजी घ्यावी व अण्णा लवकरात लवकर पहिल्या सारखे व्हावेत यासाठी मयुरेश्वर गणपती कडे नांनानी प्रार्थना केली.
या वेळी संघटनेचे पदाधिकारी उपस्थित होते.

SB 24 NEWS LIVE पोर्टल वर बातम्या व जाहीरातीसाठी
मुख्यसंपादक -शरद भगत.
संपर्क -7756089343





















